महिलेस पेटविण्याचा प्रयत्न

अहमदनगर- चारित्र्याचा संशय घेऊन महिलेच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून तिला घरासह पेटवून देण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शहरातील सावेडी परिसरातील तपोवन रोडवरील फणसेमळा, बिरोबा मंदिराजवळ, ढवणवस्ती येथे मंगळवारी (दि.16) पहाटे 4.30 वाजता घडली.

सोनाली रमेश घोलप (वय 32, रा.फणसेमळा, बिरोबा मंदिराजवळ, ढवणवस्ती, तपोवनरोड) ही महिला त्यांच्या मुलांसमवेत तेथे राहतात. तिचा पती लष्करात नेमणुकीस होता पतीच्या मृत्यूनंतर तिच्या घरी तिच्या ओळखीचे आप्पासाहेब नारायण भागवत (रा.सम्राटनगर, खंडेश्‍वर मंदिराजवळ, नवनागापूर) यांची ये-जा सुरु होती. काही दिवसानंतर भागवत हा त्या महिलेवर चारित्र्याचा संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. मंगळवारी रात्री भागवत हा तिच्या घरी उशिरा आला. त्यावेळी तिने घराचा दरवाजा उघडला नाही. याचा रागा येवून त्याने घरात लहान मुले असताना दारावर पेट्रोल टाकुन पेटवून दिले. तिच्यासहीत तिच्या मुलांना जाळुन मारण्याचा प्रयत्न केला. या आगीत घरातील दोन गाद्या, सोकेश, लाकडी कपाट, मुलांच्या शाळेच्या बॅगा, सिलींग फॅन, संसारोपयोगी वस्तु असे 95 हजार रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे लक्षात येताच आजुबाजूच्या नागरिकांनी त्वरीत पाण्याचा मारा करुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी भादविक 307, 436, 341 प्रमाणे खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्याची नोंद केली असून तपास महिला पोलिस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा