दुचाकीच्या धडकेत वृद्धा जखमी

अहमदनगर- नगर-पाथर्डी रोडने भरधाव वेगात जाणार्‍या मोटारसायकलने पायी रस्ता ओलांडणार्‍या 70 वर्षीय महिलेस धडक दिली. या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. ही घटना शहापूर गावात बुधवारी (दि.14) सायंकाळी 5 वा. घडली.

ताईबाई विश्‍वनाथ देवकर (वय 70, रा. शहापूर) ही वृध्दा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या मोटारसायकलने (क्र. एम एच 23, ए झेड 6896) जोराची धडक दिली. या धडकेत ताईबाई या गंभीर जखमी झाल्या. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी ताईबाई देवकर यांच्या फिर्यादीवरून भादंविक 279, 337, 338, मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास हे.कॉ.वराट हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा