केडगाव उपनगरांचा विस्कळीत होणारा पाणीपुरवठा सुरळीत करा

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या सूचना; पाणीपुरवठा विभागाची घेतली आढावा बैठक

अहमदनगर – केडगाव परिसरातील सर्व उपनगरांचा वारंवार विस्कळीत होणारा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत.

केडगांव परिसराला पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टिने महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी उपमहापौर सौ.मालनताई ढोणे, नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, उपायुक्त प्रदिप पठारे, सुरज शेळके, गणेश नन्नवरे, अभियंता एम.डी.काकडे, केडगांव विभाग प्रमुख सुखदेव गुंड तसेच फिटर, व्हॉलमन आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केडगांव भागात किती उंच टाक्या आहेत, नळ कनेक्शन किती आहेत, उपलब्ध कर्मचारी याची माहिती घेतली. केडगांव भागामध्ये काही भागात 2 दिवसाआड पाणीपुरवठा तर काही भागामध्ये 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. कापरे मळा उंच भागात असल्यामुळे सदर भागात पाणी पुरवठा करण्यास अडचण असल्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना करून त्याठिकाणी पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. इंदिरानगर भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. सदर टँकरच्या खेपा व्यवस्थित करत नसल्यास तो टँकर रद्द करून नवीन टॅकर सुरू करण्याबाबत निविदा काढण्याच्या सूचना दिल्या. केडगांव भागात लाईन लिकेज झाल्यास दुरूस्ती करण्यासाठी जेसीबी व मशिनरी उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले. बाबर मळा या भागात असलेल्या लाईनवर अनाधिकृत कनेक्शनवर कारवाई करून बंद करण्याच्या सूचना दिल्या. कायनेटिक चौक परिसरात पाण्याच्या लाईनला प्रेशर नसल्यामुळे या परिसरात नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टिने त्या भागात काय उपाय योजना कराव्या लागेल, त्या तातडीने करण्याच्या सूचना दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा