श्री व्यंकटेश वरला कल्याणम लग्न थाटात साजरा, सव्वा रुपयात जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा

अहमदनगर- श्रमिक नगर येथील श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या 26 व्या वार्षिक महोत्सव (ब्रम्होत्सव) निमित्त श्री व्यंकटेश वरला कल्याणम (बालाजी विवाह) सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्यावतीने सव्वा रुपयात 8 जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावण्यात आला. विवाहाकरीता, नगर, जालना, संगमनेर, सातारा, सांगली, पुणे, जुन्नर, यवतमाळ आदी ठिकाणाहून वधूवर आले होते यावेळी आदींसह शहरातील प्रतिष्ठित नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आतापर्यत 180 सामुदायिक विवाह लावण्यात आले आहेत.

पहाटे सुप्रभातम पद्मशाली पुरोहित संघमने केले जलघटाभिषेक व सकाळी सत्यनारायण महापुजा व होमहवन पुणाहुती करण्यात आले. यावेळी राजू मामा जाधव, विजय कारमपुरे (ठाणे), रविंद्र कटारिया, कैलास गरुड (मुंबई), राहुल येमूल (पेशवाई पुणे) गोरखनाथ पासकंटी, कुमार आडेप आदी उपस्थित होते.

विवाहापुर्वी श्रमिक नगर परिसरातून भगवान बालाजी पालखी (वरात) मिरवणुक वाद्यांसह काढण्यात आली. मिरवणुकीत महिला भजनी मंडळी टाळ घेऊन सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करुन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

श्री व्यंकटेश वरला कल्याणम् (लग्न) साठी बालाजी कल्याणम हॉबी टेलर्सचे राजुशेठ प्रकाश येनगंदुल, पद्मावती कल्याणम रवी शशिकांत दंडी, लक्ष्मी कल्याणम चंद्रकांत लक्ष्मण म्याना यांनी सपत्नीक विधीवत पूजा करुन बालाजी विवाह लावला. संपुर्ण परिसर श्रीमन व्यंकटरमना गोविंदा गोविंदाच्या जय घोषाने दुमदुमले होते. विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यासह राज्याबाहेरुन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बालाजी मंदिराला आकषक विद्युत रोषणाई केली होती यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, नगरसेवक मनोज दुल्लम, धनजंय जाधव, उदय कराळे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, सतीश शिंदे आदींसह उपस्थित होते.

विवाह सोहळ्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली. वार्षिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष विनोद म्याना, उपाध्यक्ष अशोक इप्पलपेल्ली, सचिव राजू येमूल, सहसचिव लक्ष्मण आकुबत्तीन, दत्तात्रय कुंटला, राजू गड्डम, कैलास लक्कम, संजय पेगड्याल, नारायण यन्नम, शंकर येमुल, रमेश कोडम, ज्ञानेश्वर सुंकी, अशोक बिटला, शंकर बत्तीन, कांतीलाल पत्तीपाका, कुमार ए कोलपेक, श्याम बोगा, बळीराम कोलपेक तसेच सामुदायिक विवाह समितीचे किसनराव बोम्मादंडी, नरसय्या काटाबत्तीन, शिवराम श्रीगादी, अंबादास महेसुनी आदींसह श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेचे सर्व विश्‍वस्तांनी परिश्रम घेतले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा