वृषाली गिरवले सी.ए. परीक्षा उत्तीर्ण

अहमदनगर- इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया तर्फे मे महिन्यात घेण्यात आलेल्या फायनल सी.ए. परीक्षेत वृषाली विलास गिरवले ही उत्तीर्ण झाली आहे.

तिचे प्राथमिक शिक्षण भाऊसाहेब फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये झाले असून माध्यमिक शिक्षण भाऊसाहेब फिरोदिया महाविद्यालयात झालेले आहे.

तिला याकामी सी.ए. गिरीश घैसास, सी.ए. संदीप देसर्डा, सी.ए.प्रसाद भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले. विलास रामभाऊ गिरवले यांची कन्या असून कै. कैलास मामा गिरवले व बाबासाहेब गिरवले यांची पुतणी आहे.