प्रोफेसर कॉलनी चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तातडीने उभारावा

विनायकराजे प्रतिष्ठानची खा. डॉ. सुजय विखेंकडे मागणी

अहमदनगर- सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित केलेला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा तातडीने बसवावा, अशी मागणी विनायक राजे प्रतिष्ठानच्यावतीने खा. डॉ. सुजय विखे पा. यांच्याकडे करण्यात आली आहे.

याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष विपूल वाखुरे पाटील व उपाध्यक्ष विनय वाखुरे पा. यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा. डॉ. विखे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, याविषयी आम्ही गेली 10 वर्षापासून महानगरपालिकेसोबत पाठपुरावा करीत असून यातील नेमकी काय अडचण आहे ही आजतागायत महापालिकेने समोर आणलेली नाही. बदललेल्या नियमानुसार मुख्य चौकात येणारी कायदेशीर अडचण लक्षात घेता प्रोफेसर चौकात असणार्‍या नाट्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ हा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी आम्ही वारंवार करीत असून याचा ठराव मंजूर होऊन दहा वर्ष उलटलेली आहेत. या संबंधित मुर्तीकारास रक्कम ही पोहोच झालेली आहे. आता ईच्छाशक्तीचा अभाव व कायदेशीर परवानग्या यामध्ये ही प्रकरण प्रलंबीत आहे. तरी याविषया मागील वर्षी महापौरांना विषयाचे पत्र स्वत:च्या रक्ताने लिहून देऊनही यावर कुठलीही प्रगती केलेली नाही तरी आपण या प्रकरणात तातडीने लक्ष घालून प्रलंबीत असलेल्या परवानग्या मिळविण्यासाठी महानगरपालिकेला आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.