पूरग्रस्तांसाठी विहिपची नगर शहरात मदत फेरी

मदतकार्यात नगरकरांनी सहभागी व्हावे : गजेंद्र सोनवणे यांचे आवाहन

अहमदनगर – सांगली व कोल्हापूरमध्ये पूरग्रस्त बांधवाच्या मदतीला नगरकरांनी ’’एक हात मदतीचा’’ देऊन सहकार्य करावे. जीवनावश्यक वस्तू, नवीन कपडे, धान्य स्वरूपात 12 ते 15 ऑगस्टपर्यंत दिल्लीगेट येथील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात मदत स्वीकारली जाईल. विहिंपचे कार्यकर्ते ’’सेवा सुरक्षा संस्कार’’ या त्रिसूत्रीप्रमाणे मदत कार्यात सहभागी झाले आहेत. या मदतकार्यात नगरकरांनी सहभागी व्हावे. असे आवाहन विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सहमंत्री गजेंद्र सोनवणे यांनी केले आहे.

दिल्लीगेट येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे पूरग्रस्तांसाठी नगर शहरातून मदत फेरी काढण्यात आली. याप्रसंगी गजेंद्र सोनवणे बोलत होते. याप्रसंगी विश्वहिंदु परिषदेचे मठ मंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे, बजरंगदल जिल्हाध्यक्ष गौतम कराळे, सतसंग प्रमुख सागर होनराव, सी.ए.अमोल कासट, राजेंद्र पडोळे, डॉ.मनोहर देशपांडे, डॉ.मिलिंद मोभारकर, प्रखण्डमंत्री राजेंद्र चुंबळकर, बजरंगदल तालुका संयोजक गणेश कराळे, आनंद कुलकर्णी, राजेश सटाणकर, बलराज बिल्ला, चंद्रकांत मानकर, ओम बांदल आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा