वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी

अहमदनगर- भरधाव वेगात जाणार्‍या वाहनाने पायी चालणार्‍या दादासाहेब नागू देसले (वय 50, रा.धामणगाव, ता.आष्टी, जि.बीड) यांना जोराची धडक दिली. या धडकेत देसले हे गंभीर झाले. ही घटना प्रेमदान चौक-झोपडी कॅन्टीन रस्त्यावर बुधवारी (दि.8) 7 वाजता घडली.

दादासाहेब देसले हे रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून वेगात आलेल्या वाहनाने (क्र.एमएच 23 एक्यु 8018) त्यांना जोरात धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. अपघात होताच वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी देसले यांच्या फिर्यादीवरुन अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पो.ना.शिंदे हे करीत आहेत.