विभागीय कुस्ती स्पर्धेत वैष्णवी पालवेचे यश

भिंगार- प्रियदर्शनी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. इंदापूर येथे 2 रोजी झालेल्या कुस्तीच्या विभागीय स्पर्धेत प्रियदर्शनी पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कु. वैष्णवी रविंद्र पालवे या विद्यार्थिनीने 19 वर्षे वयोगटातील 62 किलो वजन गटात पुणे व सोलापूर येथील विद्यार्थिनीशी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात विजयी होऊन आळंदी येथे होणार्‍या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली असून तिचे अभिनंदन होत आहे.

या यशासाठी प्रियदर्शनी पब्लिक स्कूलचे चेअरमन बाळासाहेब खोमने, मुख्याध्यापिका सौ. योगिता पवार व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या विद्यार्थिनीला शाळेचे कुस्तीचे प्रशिक्षक व राज्यपंच असलेले समीर पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा