घरात सुख-शांतीसाठी

घरात सुखशांतीसाठी ड्रॉईंग रुममध्ये ताज्या फुलांचा गुलदस्ता ठेवावा. ह्या नंदादीपाच्या वातीचे तोंड नेहमी पूर्व वा उत्तर दिशेलाच असावे. त्यायोगे वास्तुत राहणार्‍या व्यक्तींना सुख मिळून दीर्घायुष्यही लाभते. नंदादीपाचे तोंड पश्चिम वा दक्षिण दिशेला कधीही ठेवू नये. ते निःसंशय हानीकारक आहे.

हॉलच्या पूर्वेकडील भिंतीवर उत्तुंग पर्वत शिखराचे व उत्तरेकडील भिंतीवर डोंगरदर्‍यातून झुळूझुळू वाहणार्‍या निर्झराचे किंवा उंचावरून खाली झोपावणार्‍या धबधब्याचे पोस्टर लावा. या योगे तुमच्या प्रसिद्धीत व नावलौकिकात वाढ होते, असा माझा अनुभव आहे. त्याचप्रमाणे घरात शांती ठेवावी.