अभ्यासाच्या खोलीबाबत

अभ्यासाच्या खोलीची रचना अशी करा की, अभ्यास करणार्‍याचे तोंड पूर्व किंवा ईशान्येकडे होईल. तसेच, पूर्व किंवा ईशान्येस एक खिडकी असावी. या खोलीत मोठ्या, अवजड गोष्टी (ज्यासमोर उभे राहिल्यावर दडपल्यासारखे वाटते अशा वस्तू) अनावश्यक ठेवू नयेत. या खोलीचे स्वरूप अडगळीची खोली म्हणून करू नये. अभ्यासाच्या खोलीत उत्तम प्रकाशव्यवस्था असावी. (नैसर्गिक असल्यास उत्तम.)