वाळुची वाहतुक करणारा ट्रक पकडला

अहमदनगर – विना परवाना व बेकायदेशीररित्या वाळुची चोरीटी वाहतूक करताना ट्रक कर्जत पोलिसांनी शिताफीने पकडला. या कारवाईत 6 ब्रास वाळुसह ट्रक पोलीसांनी जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 11) सकाळी 10 च्या सुमारास कर्जत शिवारातील करपडी फाटा येथे करण्यात आली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कर्जत पोलिसांना वाळु घेऊन जाणारा संशयित टिपर (क्र. एम एच 16 ए ई 5616) व ट्रक (क्र. एमएच 12 एलटी 8321) या प्रत्येकी 3 ब्रास वाळू घेऊन जाताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्यांना थांबविले असता दोन्ही वाहनांवरचे चालक पसार झाले. पोलिसांनी 5 लाख 15 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी कर्जत पोलिसांनी भादंविक 379, 34, पर्यावरण संरक्षण कायदा कलम 3 / 15 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मोरे हे करीत आहेत.