उर्दू साहित्यीक उपक्रम मेंदूला चालना देणारे-डॉ. कमर सुरुर

अहमदनगर- उर्दू वाचकांची संख्या मोठी आहे. पण शिक्षण सोडून अनेक वर्षे झालेली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात भुतकाळात शिकलेल्या गोष्टी माणूस विसरत चालला आहे. अशावेळी विशेष करुन उर्दू साहित्यातील बाबी प्रदर्शनाद्वारे मुलांनी व उर्दू विषय शिकवणार्‍या शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेऊन मांडलेल्या उर्दू साहित्यिक उपक्रम मेंदूला चालना देणारे आहे, असे प्रतिपादन उर्दू साहित्यिक व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव कवियत्री डॉ. कमर सुरुर यांनी केले.

चाँद सुलताना हायस्कूलच्या विविध विषयांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. कमर सुरुर बोलत होत्या. यावेळी प्राचार्या रिजवाना शेख, शेख अकील अहमद, युसूफ तांबोळी, रिजवान सौदागर, शफी खुदाबक्ष आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना डॉ. कमर सुरुर म्हणाल्या की आज हे प्रदर्शन बघून खात्री झाली की, शिक्षकांनी मनापासून काम केल्यास नक्कीच शिक्षणाचा दर्जा वाढेल. अशा प्रदर्शनाचे वारंवार आयोजित करुन मुलांमधील कौशल्याचे पालकांना जाणिव करुन द्यावी व त्यांनाही मुलांकडे लक्ष देण्याचे व अभ्यास कसा घ्यावा, याचे मार्गदर्शन शिक्षकांनी करावे, असे नमुद केले.

हे प्रदर्शनी शाळेनी दोन दिवसांसाठी आयोजित केले होते. दोन्ही दिवशी पालकांनी व इतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. मुलांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या प्रतिकृती व उपक्रम बघून पालकही चकीत झाले होते. त्यांनी शिक्षकांचे भरभरुन कौतुक केले.

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा