उपवासाचे ढोकळे

साहित्य –

२०० ग्रॅम भगर,१०० ग्रॅम राजगिरा पीठ, १०० ग्रॅम शिंगाड्याचे पीठ, चवीनुसार शेंदेलोण, एक वाटी दही, एक चमचा सोडा, तळण्यासाठी तेल व थोडं जिरं.

कृती – भगर २ तास पाण्यात भिजत ठेवावी. दह्याला फेटून त्यात राजगिरा व शिंगाड्याचे पीठ टाकावे. भगर बारीक वाटून त्यात सर्व साहित्य टाकावे व त्यात एक चमचा सोडा व मीठ टाकून चांगले फेटून कुकरच्या भांड्यात ठेवून एक शिटी येऊ द्यावी. थंड झाल्यावर त्याचे काप करावे व तेल गरम करून त्यात जि-याची फोडणी द्यावी. वरून कोथिंबीर पेरावी.