तुळशीचा एक उपाय श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवून देईल

सर्वात आधी पूजनाबद्दल सांगायचे, तर तुळशीची आठ नावे सांगण्यात आली आहेत, ज्याचा जप करणे अत्यंत फलदायी ठरतं.

वृन्दा वृन्दावनी विश्वपूजिता विश्वपावनी।

पुष्पसारा नंदनीच तुलसी कृष्ण जीवनी।

तुळशीची ही आठ नावं जपल्याने अक्षय फळप्राप्ती होते.

तसेच सकाळी स्वत: आंघोळ केल्यानंतर तुळशीला पाणी घातल्याने सर्व प्रकाराचे संकट दूर होतात. समस्या सुटतात, भौतिक सुखाची प्राप्ती होते. नोकरी आणि व्यवसायसंबंधी काही अडचणी असल्यास त्यादेखील दूर होतात. तसेच दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. दिवा लावून तुळशीचा प्रदक्षिणा घालावी.

दररोज शक्य नसल्यास किमान एकादशीला हे नियमान करावे. याने कुटुंबातील प्रेम टिकून राहतं आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तुळस किती पवित्र आहे हे तर आपल्याला माहीतच असेल. याने जल, अन्न, स्थळ सर्व शुद्ध होतात. ग्रहणात पाणी, धान्यात, दुधात तुळशीचे पान घालून ठेवल्याने त्यावर ग्रहणाचा प्रभाव पडत नसतो असे मानले गेले आहे. म्हणूनच विष्णूंना नैवेद्य दाखवताना वर तुळशीचे पान ठेवावे.

तसेच धर्म शास्त्रानुसार मृत्यूनंतरदेखील मृतकाच्या मुखात तुळशीचे पान ठेवल्याने व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते.

आता उपायाबद्दल बोलू या…

खूप प्रयत्न करूनदेखील व्यवसाया‍त किंवा नोकरीत मनाप्रमाणे यश मिळत नसेल तर आपल्याला गुरुवारी एक उपाय करायचा आहे. आपण हा उपाय गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवसाला करू शकता. या दिवशी आपल्याला श्याम तुळस अर्थात काळ्या तुळशीच्या जवळ असलेले गवत घेऊन पिवळ्या रंगाच्या कापडात बांधायची आहे आणि हे आपल्या तिजोरी, लॉकर, व्यवसायातील गल्ला किंवा किमती दागिने, वस्तू ठेवत असलेल्या जागेवर ठेवायची आहे. याने निश्चितच प्रगती होईल.

आपल्याला मुलांकडून सुख मिळत नसेल किंवा आपल्या सांगण्यात नसेल तर रविवारीला तुळस तोडू नये म्हणून इतर दिवशी तुळशीची तीन पाने तोडून मुलांना खायलादिल्यास ती आपल्या सांगण्यात राहतील. तसेच तुळशी पूजन करताना आपल्या सवाष्ण दिसल्यास तिला लक्ष्मी स्वरूप मानून तुळशीचे वाहिलेले कुंकू लावावे आणि तेच कुंकू आपल्या मुलालादेखील लावावे. याने त्याची वागणूक चांगली होईल, वाईट संगत असल्यास दूर होईल.

आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचं झाड पूर्व दिशेकडे असावं. असं करणं शक्य नसल्यास उपाय करण्याच्या दोन दिवसांपूर्वीच तरी झाडाची दिशा परिवर्तित करून घ्यावी. तसेच ज्या कन्येचा विवाहाचा योग येत नसेल, तिने दक्षिण पूर्व दिशेत तुळशीचं झाड ठेवून पूजन करावे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा