त्रिशूल मित्र मंडळाच्यावतीने सामूहिक अथर्वशीर्ष पठण

अहमदनगर- सिव्हील हडको परिसरातील त्रिशूल मित्र मंडळाच्यावतीने श्रीकृष्णरुपातील गणपती समोर एकादशी व गणेशोत्सवाचे औचित्य साधून येथील श्री स्वामी समर्थ परिवारातील भगिनींनी सौ. रेवती कुलकर्णी यांच्या पुढाकाराने सामूहिकरित्या अत्यंत भक्तीमय वातावरणात अथर्वशीर्षाचे पठण केले.

यामध्ये सौ. उकांडे, सौ. सुमन बारगजे, सौ. मेघा कंदलकर, सौ. डिक्कर, श्रीमती अरुणा गायकवाड, श्रीमती जोशी, चि. स्तवन उकांडे, कु. स्वामिनी कंदलकर आदी सहभागी झाले होते. सामूहिक अथर्वशिर्ष पठणानंतर विश्‍वकल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सौ. रेवती कुलकर्णी यांनी केले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा