त्रिरत्न बौद्ध महासंघच्यावतीने वर्षावासानिमित्त जाहीर धम्म प्रवचन

अहमदनगर- जगात बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करणार्‍या त्रिरत्न बौद्ध महासंघ शाखा अहमदनगरचेवतीने वर्षावासानिमित्त रविवारी, दि.11 ऑगस्ट ते दि.13 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक रविवारी सकाळी 10.30 वा. धम्म प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

सिद्धार्थबाग (सिद्धीबाग) भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्याजवळ, दिल्लीगेट येथे या प्रवचन मालिकेचा उद्घाटन समारंभ रविवार, दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वा. होणार असून याप्रसंगी औरंगाबाद येथील धम्मचारी ललित सिद्धी यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व धर्मांतर याविषयावर प्रवचन होणार आहे. तसेच पुढील प्रत्येक रविवारी धम्मचारी अभयशिल, ज्ञानराजा, शुद्धरत्न, नित्यबोद्धी ज्ञानपर, धम्मप्रचारक दिपक अमृत असे विविध मान्यवरांची प्रवचने होणार आहेत.

तरी दर रविवारी होणार्‍या जाहीर प्रवचन मालिकेस उपस्थित रहावे असे त्रिरत्न बौद्ध महासंघाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा