तिरुपती

हे चित्तूर जिल्ह्यात हैद्राबादच्या दक्षिणेस ३६४ मैलांवर ७०० मीटर  उंचीवरच्या डोंगरावर श्री व्यंकटेश्वर  मंदिर आहे.याला बालाजी मंदिर पण म्हणतात . हा विष्णूचा अवतार मानला जातो . या सात  टेकड्यांच्या समूहाला तिरुमला डोंगर असे नाव आहे .त्याला फणांच्या शेषशायी नागाची प्रतिकृती मानतात  व त्यावर  विष्णू झोपलेला आहे असा भाविकांचा समज आहे. ह्या नागाला आदिशेष म्हणतात .

हे मंदिर ९ व्या शतकात उभारले गेले आहे .येथे रोज सुमारे २५००० भाविक येतात  व उत्सवात ही संख्या एक लाखापर्यंत पोहोचते. छताचा खांब ,कळस व  मंदिराचे दरवाजे यांना सोन्याचा वर्ख दिलेला आहे . मूर्ती ७ फुट  उंच व  काळ्या दगडाची आहे.यांचे  वार्षिक उत्पन्न १५०००००००  रुपये आहे व दरवर्षी वाढत आहेत .मूर्तीच्या अंगावर रत्नजडीत अलंकार  घालतात .बाजूला श्रीदेवी व भूदेवी यांचे मूर्ती आहेत.येथील म्युझियम बघण्यासारखे आहे,मंदिरात ६००० सेवक वर्ग आहेत.गावात गोविंद राज स्वामी मंदिर आहे .तिरुमाला-तिरुपती  देवस्थानने जमलेल्या पैशातून विविध लोकोपयोगी कार्ये केली आहेत.संस्था उभारल्या आहेत  व याची तुलना व्ह्याटीकनशी करतात .

मार्ग :- रेनिगुनता शहरात १५ किमी अंतरावर तिरुपती विमानतळ आणि रेल्वे स्टेशन आहे . तिरुपती पासून बंगलोर २५३ किमी,चेन्नई १५८ किमीआणि हेद्राबाद ५५८ किमी आहे.यासाठी बस सेवा उपलब्ध आहे .

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा