सकारात्मक दृष्टिकोन जीवनाची दशा व दिशा बदलू शकते ..

काही व्यक्ती नेहमी आनंदी असतात. हा आनंद त्या व्यक्तींच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी नाहीत म्हणून आलेला नसतो, तर जीवनामध्ये अडचणी आल्यानंतरही त्यांचा मोठ्या धैर्याने सामना करणाऱ्या या व्यक्ती असतात. आयुष्यामध्ये कितीही बरे वाईट प्रसंग आले, तरी या व्यक्तींची सकारात्मक विचारसरणी त्यांना आयुष्याचे प्रत्येक वेडेवाकडे वळण समर्थपणे पार करण्याची ताकद देत असते.

डेव्हीड आणि गोलियथची गोष्ट सकारात्मक विचारांचे चांगले उदाहरण आहे. गोलियथ एक राक्षस होता. त्याने प्रत्येकाच्या हृदयात आपली दहशत निर्माण केली होती. एके दिवशी मेंढ्यांना चारा खाऊ घालण्यासाठी 17 वर्षांचा डेव्हीड हा एक मुलगा आपल्या भावाला भेटण्यासाठी आला. तुम्ही या राक्षसाशी लढा का देत नाही, असे त्याने आपल्या भावाला विचारले. भावाने त्याला विचारले की, तू त्या राक्षसाचा आकार पाहिला आहेस का? तो इतका मोठा आहे की, एका फटक्यात आम्हाला मारुन टाकेल, असेही भाऊ म्हणाला.

यावर डेव्हीड म्हणाला, ‘तो मोठा आहे म्हणून त्याला मारता येणार नाही असे नाही. गोष्ट ही आहे की तो इतका मोठा आहे म्हणून त्याच्यावर सहजपणे निशाणा साधता येईल. त्याच्यावर लावण्यात आलेला निशाणा कधी चूकू शकणार नाही’. डेव्हीडने त्याच्याकडील बाणांनी राक्षसाला मारुन टाकले. राक्षस तोच होता. पण, डेव्हीडचा दृष्टिकोन त्याच्या भावापेक्षा वेगळा होता. डेव्हीडचा दृष्टिकोनही त्याच्या भावासारखाच असता तर तोही आयुष्यभर राक्षसाला घाबरत राहिला असता आणि त्याला त्याने केलेले अन्याय सहन करत रहावे लागले असते.

या गोष्टीतून हेच समजते कि, समस्या लहान असल्या किंवा मोठ्या तरी त्यामुळे घाबरुन जायचे नसते. प्रत्येक समस्या आपल्या बरोबरीची किंवा त्यापेक्षा जास्त संधी देते असे लेखक नेपोलियन हील यांनी म्हटले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा