मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नगरमध्ये स्वागत

अहमदनगर- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांचा मंत्री मंडळात कॅबिनेट मंत्रीपदी समावेश झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. अडचणीच्या काळातही प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी मोलाची भुमिका बजावून काँग्रेस पक्षाला विधानसभेत चांगले यश मिळवून दिले आहे. मंत्रीमंडळातील समावेशामुळे जिल्ह्यातील अनेक प्रश्‍न हे त्याच्या माध्यमातून मार्गी लागतील. विशेषत: महिलांच्या प्रश्‍नांना प्राधान्य राहील, अशी अपेक्षा काँग्रेसच्या महिला प्रदेश सदस्या शिल्पाताई दुसुंगे यांनी केले.

बाळासाहेब थोरात मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नगर शहरात आले असता त्यांचे काँग्रेसच्या महिला प्रदेश सदस्या शिल्पा दुसुंगे यांनी स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी कांचन थोरात, आ.सुधीर तांबे, आ.लहू कानडे, डि.एम.कांबळे, शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, संपतराव म्हस्के, महिमा दुसुंगे, मार्गरेट जाधव, अनिता पाटील आदि उपस्थित होते.

याप्रसंगी आ. थोरात यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारुन सर्वांनी जिल्हाच्या विकासासाठी एकत्रित काम करावे. याबाबत वेळोवेळी बैठका घेऊन असेही त्यांनी यावेळी सांगितले.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा