शिवराज भोर बासरीवादनात देशात तिसरा

अहमदनगर- अखिल लोककला कल्चरल ऑर्गनायझेशन पुणे आयोजित संस्थेतर्फे ऑल इंडिया स्तरावरुन घेण्यात आलेल्या स्पर्धेत संगीत बहार (गुरुकुल) विहारातील साधक कु.शिवराज बाबा भोर याने शास्त्रीय स्वरवाद्य (बासरी) वादन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून सांस्कृतिक क्षेत्रात अहमदनगरचा नावलौकिक मिळविला आहे.

या स्पर्धेत एकूण 22 राज्यातील 1600 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात त्याला तबला साथासंगत राम सुळूंकर यांनी केली व गुरुवर्य प्रसिद्ध बासरीवादक जितेंद्र प्रताप रोकडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिवराज हा इ.5वीचा नेप्ती विद्यालयाचा विद्यार्थी असून, त्याला यापूर्वीही जिल्हा व राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा