नालेगाव येथे चोरी

अहमदनगर – येथील नालेगाव परिसरात असणार्‍या दातरंगे मळ्यातील आदर्श कॉलनीत अज्ञात चोराने उघड्या घरात प्रवेश करून कपाटातील 70 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि.6) दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, अंकुश रामचंद्र सुर्यवंशी (वय 68, रा. आदर्श कॉलनी, दातरंगे मळा, नालेगाव, नगर) यांच्या घराच्या उघड्या दरवाजाने दोन अज्ञात इसमांनी घरात येऊन घरातील कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले.

याप्रकरणी अंकुश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीसांनी भादंविक 380, 34 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास हे.कॉ. गायकवाड हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा