गर्दीचा फायदा घेऊन भाविकाला गंडा

अहमदनगर- गुरूवारी होणार्‍या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दर्शनाला आलेल्या भाविकाच्या ऐवजाला हात घालून पोबारा केल्याची घटना काल गुरूवारी (दि.13) सायंकाळी 6 ते 7 च्या दरम्यान हिंदु-मुस्लिम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मिरावली पहाडावर (मिनीनाथांची समाधी) घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बशीर जमाल मुलानी (वय 58, रा. निंबोडी पारवाडी, बारामती, जि. पुणे) हे सहकुटुंब समाधीच्या दर्शनाला आले असता तेथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधील 5 हजार 300 रूपये रोख, 20 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने व सहा हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल असा 30 हजार 300 रूपयांचा ऐवज चोरून नेला.

याप्रकरणी कॅम्प पोलीसांनी बशीर मुलानी यांच्या फिर्यादीवरून भादंविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असुन अधिक तपास हे.कॉ. घायतडक हे करीत आहेत.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा