मोबाईलची चोरी

अहमदनगर – रस्त्याने पायी जाणार्‍या 28 वर्षीय पादचार्‍याचा 10 हजार रूपये किंमतीचा रेडमी एमआय नोट 5 कंपनीचा मोबाईल अज्ञात चोरांनी खिशातुन चोरून नेला. ही घटना पाईपलाईन रोडवरील मोरया मंगल कार्यालयासमोर सोमवारी (दि.13) रात्री 10.45 च्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रतिक मोरेश्‍वर सोहोनी (वय-28, रा. विद्या कॉलनी, पाईपलाईन हडको, सावेडी) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास हे.कॉ. मोरे हे करीत आहेत.