महिलेच्या गळ्यातील गंठण पळवले

अहमदनगर- घराकडे पायी जाणार्‍या 32 वर्षिय महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण मोटारसायकलवरील अनोळखी चोरांनी बळजबरीने हिसकावून तोडून चोरुन नेले. ही घटना रविवारी (दि.8) साडेदहा वाजता नगर-कल्याण रोडवरील माधवनगर बोर्डाजवळ घडली.

सविता सुनील बाचकर (वय 32, रा.माधवनगर, कल्याण रोड, अ.नगर) या रस्त्याने पायी घराकडे जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या अनोळखी स्वाराने त्यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण हिसकावून तोडून चोरुन नेले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सविता बाचकर यांच्या फिर्यादीवरुन भारतीय दंड विधान कलम 392, 34 प्रमाणे जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास साहयक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.