इलेक्ट्रॉनिक मोटारची चोरी

अहमदनगर – बंद वर्कशॉपचा दरवाजा उचकटून अज्ञात चोराने आतील 4 हजार रुपये किंमतीच्या पाण्याच्या दोन इलेक्ट्रॉनिक मोटार चोरुन नेल्या. ही घटना सोमवारी (दि.11) पहाटेच्या सुमारास सर्जेपूरा येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेच्या आवारात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सर्जेपुरा येथे एसटी महामंडळाची विभागीय कार्यशाळा असून या कार्यालयाच्या आवारात असलेल्या शॉपमध्ये दुरुस्तीकरीता आलेल्या मोटारी ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी पहाटेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोराने बंद गॅरेजचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. आतील 1 हजार रुपये किंमतीची लक्ष्मी कंपनीची पाण्याची मोटार तसेच 3 हजार रुपये किंमतीची 1 हॉर्सपावरची एलजी कंपनीची पाण्याची मोटार अशा 4 हजार रुपये किंमतीच्या मोटारी चोरुन नेल्या.

याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी प्रभारी उपयंत्र अभियंता विभागीय कार्यशाळा सौ. मनिष संदिप देवरे (वय 40, रा.एसटी कॉलनी सर्जेपुरा, रायगड अधिकारी क्वॉटर्स, नगर) यांच्या फिर्यादीवरुन भादविक 379 प्रमाणे चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस नाईक सचिन पवार हे करीत आहेत.