द युनिव्हर्सल फौंडेशन टॅलेंट ऑफ अहमदनगरची प्राथमिक फेरी 16 ऑगस्टपासून सुरू होणार

अहमदनगर- द युनिव्हर्सल फौंडेशन, अहमदनगरच्यावतीने दरवर्षी भव्य टॅलेंट ऑफ अहमदनगर 2019 चे आयोजन करण्यात येते. याहीवर्षी अहमदनगरमध्ये जिल्हास्तरीय नृत्य, अभिनय, गायन, वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धेमध्ये वयोगट 9 ते 12, 13 ते 16, 17 ते 20 व 21 पुढील याप्रमाणे असून 16 ते 18 ऑगस्टला प्राथमिक फेरी (ऑडिशन) चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संचालक सागर आलचेट्टी यांनी दिली. युवा कार्यक्रम एवम् खेल मंत्रालय भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र, जय युवा अॅकॅडमी, रयत प्रतिष्ठान आदि मार्गदर्शन, सहकार्य करणार असून जिल्हा युवा समन्वयक शिवाजीराव खरात, स्वाती बनकर, अॅड. महेश शिंदे, पोपटराव बनकर आदि मार्गदर्शन करणार आहेत.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व सहभागासाठी मोबाईल 8983984999 क्रमांकावर संपर्क साधावा. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे संयोजक समितीने कळविले आहे.