ठकास महाठक

दिल्लीतल्या एका मुलाशी बाहेरगावच्या एका मुलीचा विवाह ठरला ; म्हणून लग्नासाठी मुलीकडील वऱ्हाड दिल्लीला आले.पण आयत्या वेळी ठक असलेल्या वरपित्याने वधुपित्याला एक अट घातली-‘या विवाहाप्रीत्यर्थ तुम्ही आम्हाला आमच्या घरच्या परसदारी असलेली विहीर भरून तूप द्या ,तेव्हाच हा विवाह पार पडेल.’

वरपित्याच्या या अटी मुळे वधूकडील मंडळी घाबरून गेली;पण त्यांच्यावर आलेली या संकटाची बातमी ते जेथे जानवशाला उतरले होते त्या गृहस्थांना कशी तरी समजली .त्याने वधुपित्याला बिरबलला भेटण्यास सांगितले;म्हणून वधूपित्याने बिरबलाकडे जाऊन आपल्यावर आलेल्या संकटाची कल्पना त्याला दिली .बिरबलाने या संकटातून सुटण्याची युक्ती त्याला सांगितली.

बिरबलाने सांगितल्याप्रमाणे वधूपिता वरपित्याकडे गेला व त्याला जरा चढेल आवाजात म्हणाला ,”भलतीच अट आमच्यावर घालून जमलेलं लग्न मोडता काय ? पण आम्ही हि काही साधी माणसं नाहीत .तुमची विहीर तुपाने भरून देण्याची आमची ऐपत आहे ;आणि म्हणून हि अट आम्हाला मंजूर आहे .पण त्याआधी पाण्याने अर्धी-अधिक भरलेली तुमची विहीर सर्व पाणी उपसून कोरडी ठणठणीत करा.पाण्याचा एक थेंबही तेथे राहू देऊ नका ;किवा झर्याचे पाणीही येणार नाही अशी तजवीज करा ;नाहीतर पाण्यात तूपं मिसळलेले आम्ही अशुभ मानतो . चला आटपा लवकर ;म्हणजे आम्हाला ती विहीर तुपाने भरता येईल”.

वधुपित्यालने असे दरडूवून सांगताच वेर्पिता नरमला;आणि केलेल्या चुकीबद्दल वधूपित्याची क्षमायाचनाकरू लागला.

अशा प्रकारे वधूपित्या वर ओढवलेले संकट बिरबलाने आपल्या चातुर्याने दर केले;आणि तो विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा