मंदिरातून चोरी

अहमदनगर – समाज मंदिराच्या दरवाजाची कडी उचकाटून अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला. आतील हिरो होंडा मोटारसायकल (क्र. एम एच 13 सी पी 8983), टाटा स्काय कंपनीचा सेटअप बॉक्स, एक डिश असा ऐवज चोरून नेला. ही घटना औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी जवळील भाऊसाहेब फिरोदिया वृध्दाश्रमातील समाज मंदिरात शनिवारी (दि.10) पहाटेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी डॉ. दिलीप दत्तात्रय कदम (वय 63, रा. भाऊसाहेब फिरोदिया वृध्दाश्रम, नगर) यांच्या फिर्यादीवरून भादंविक 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन अधिक तपास हे.कॉ. गोर्डे हे करीत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा