जीवनाला खरी दिशा देण्याचे काम शिक्षक करतात – मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग

अहमदनगर- समाजाला घडविण्यामध्ये शिक्षकांचा वाटा हा सिंहाचा असतो. त्यांच्यामुळे समाज व देश घडतो. गुरूंचा आज याठिकाणी माझ्या हस्ते सत्कार व सन्मान सोहळा संपन्न होत आहे, याचा मला विशेष अभिमान व आनंद आहे. गुरू हे नेहमीच शिष्याला अधिक चांगले घडविण्याचा प्रयत्न करीत असतात. शिक्षकांमुळे अनेक विद्यार्थी घडतात. जीवनाला खरी दिशा देण्याचे काम शिक्षक करीत असतात. मनपाचे उत्पन्न कमी असून, अगोदर पगार व पेन्शन दिले जाईल. त्यानंतर इतर कामे केली जातील. धर्मराज औटी यांच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने हा कार्यक्रम संपन्न होतो. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून हा कार्यक्रम ते आयोजित करतात. सर्व समाजातील शिक्षक-शिक्षकांचा माझ्या हस्ते सन्मान होत आहे, हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी केले.

नगर मनपा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने गुरूपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रकाश कराळे, धर्मराज औटी, सुभाष कुबडे, ख्वाजालाल नवाज खान, कुबडे सर, बबनराव सोनवणे, सखाराम गोरे, ज. बा. म्हस्के, चंद्रकांत केदार, प्रमिला चिलका, कुमार गाबरा, कुद्दुस अब्दुल अजीज, अनुराधा थिटे, मेघा कर्‍हाडकर, नलिनी कुंटला, रजिया शेख, नजमा खान, रजिया दिलावर आदी उपस्थित होते.

प्रकाश कराळे म्हणाले की, ज्यांच्या मुळे मी घडलो, त्या गुरूंचा व शिक्षकांचा मी खूप आभारी असून, मी त्यांचा नेहमी सन्मान करतो. गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूंचा सन्मान आपण करतोच. मात्र, नित्यनियमाने तो करावा. प्रत्येकाच्या जीवनाच्या यशात गुरूंचा वाटा असतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे, असे ते म्हणाले.

बबनराव सोनवणे म्हणाले की, अ.नगर मनपा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने गुरूपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. यामध्ये धर्मराज औटी सरांचा मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम संपन्न होतो. आज याठिकाणी सर्व शिक्षकांच्या एकाच जागी गाठीभेटी झाल्या आहेत.

एकमेकांमध्ये संवाद झाला, याचा विशेष आनंद आहे, असे ते म्हणाले. अ.नगर मनपा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद यावेळी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा