सुवचनानि


न सा सभा यत्र नसन्ति वृद्धा: । वृद्धा न ते येन वदन्ति धर्मम् ॥
धर्म: स नो यत्र न सत्यम्अस्ति । सत्यं न तर यच्छलनानु विद्धम् ॥
अर्थ : ज्या सभेत अनुभवी लोक नाहीत ती सभा नव्हे. जे धर्मयुक्त बोलत नाहित
ते अनुभवी नव्हेत, ज्यात सत्य नाही तो धर्म नव्हे आणि जे कपटाने दूषित आहे ते
सत्य नव्हे.
सुविचार ः सर्व भूतमात्रांत, कणाकणांत ईश्‍वर विलसत असेल तर तो माणसातही
असलाच पाहिजे. या दृष्टीतून विचार करता, प्रत्येक माणूस हा ईश्‍वराचाच अंश आहे.
प्रा. द्वारकानाथ कमलापूरकर, नगर.