पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिस कर्मचारी निलंबित

अहमदनगर – पैसे घेतानाचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नंदकुमार सांगळे याला बुधवारी रात्री पोलिस अधीक्षक इशु सिंधु यांनी तडकाफडकी निलंबीत केले.

सांगळे हे वाहतुक शाखेत असताना वाहतुक नियंत्रणाची ड्युटी बजाविताना एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते. त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या घटनेशी पोलिस अधीक्षक इशु सिंधु यांनी गंभीर दखल घेऊन ही कारवाई केली.

इशु सिंधु यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध मोहिम सुरु केली यात वाळु तस्करीसह अवैध धंदे याचे लक्ष्य करुन अवैध धंद्यांवर वचक बसविला.

तसेच ज्या पोलिस अधिकार्‍यांबाबत तक्रारी होत्या त्या पोलिस अधिकार्‍यांविरुद्ध कारवाईची कडक भुमिका घेतली त्यामुळे जिल्ह्यातील भ्रष्ट पोलिस कर्मचारी व अधिकार्‍यांमध्ये घबराट पसरली आहे.