सूर्यकांत कार्ले यांचे हृदयविकाराने निधन

अहमदनगर – सूर्यकांत महादू कार्ले (वय 68 वर्षे, रा. समर्थनगर, सागर हॉटेलमागे, श्रीराम चौक, पाईपलाईन रोड, नगर) यांचे मंगळवार 11 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

ते संरक्षण खात्यातील वेतन लेखा कार्यालयातून वरिष्ठ लेखा परीक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, सून व नातवंडे असा परिवार आहे.