नगरच्या सनी माघाडेच्या डॉ. आंबेडकरांवरील पोटरेटची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

अहमदनगर- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128 व्या जयंतीनिमित्त नगर शहरातील हमालवाडा चौक, झेंडीगेट येथील सनी भीमराव माघाडे यांनी डॉ.आंबेडकरांचे कलात्मक असे कोलाज पोट्रेट तयार केले होते. त्या पोटरेटची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

सनी माघाडे याने त्याचे मोठे बंधू लक्ष्मण माघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 300 पेन्सिल व 100 पेन वापरुन अतिशय कलात्मक असे कोलाज पोट्रेट तयार केले होते. त्या पोट्रेटची नगरसह राज्यभरात मोठी प्रशंसा झाली होती. सनी माघाडेवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. या कलात्मक पोट्रेटची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या टीमने दखल घेत रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करत सनी माघाडे याला प्रशस्ती पत्र, सुवर्ण पदक देवून त्याचा नुकताच सन्मान केला आहे.

नगरचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविल्याबद्दल नगरकरांच्यावतीने आ. संग्राम जगताप यांनी सनी माघाडेचा सत्कार केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष सुरेश बनसोडे, महापालिकेचे यंत्र अभियंता परिमल निकम, किरण दाभाडे, सिद्धार्थ आढाव, सुरेश वाघचौरे, मुजाहिद कुरेशी, लक्ष्मण माघाडे, शोहेब शेख, सागर ठोकळ, निखील चाबुकस्वार, जयेश माघाडे, अमित माघाडे, संजय माघाडे, राजू माघाडे, गोरख माघाडे, संजय जगताप आदी उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा