सुनिल निस्ताने यांचे दु:खद निधन

अहमदनगर – खिस्तगल्ली येथील कैलास निस्ताने यांचे बंधू व कैलास नागरी पतसंस्थेचे चेअरमन रखमाजी निस्ताने यांचे चुलत बंधू सुनिल बाळासाहेब निस्ताने (वय 50) यांचे मंगळवार दि.7 रोजी सायंकाळी दु:खद निधन झाले. त्यांच्यावर येथील लालटाकी येथील स्मशानभुमीत दफनविधी करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. स्व. सुनिल निस्ताने यांच्या पश्‍चात पत्नी, आई, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. सामाजिक कार्यात ते सक्रीय सहभागी असत, मनमिळावू स्वभावाचे असल्याने त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या अकस्मीक निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.