कु. सुलोचना सप्तर्षी बालवाडीतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

अहमदनगर- दि. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कु. सुलोचना सप्तर्षी पूर्व प्राथमिक तसेच कै. वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी विनीत रुणवाल मेमोरियल ट्रस्ट तर्फे करण्यात आली.

डॉ. गौरव सोनवणे व अहमदनगर होमिओपॅथिक मेडीकल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने कु. सुलोचना सप्तर्षी पूर्व प्राथमिक व कै. वि. ल. कुलकर्णी शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळेस डॉ. गौरव सोनवणे, संस्थेच्या उपाध्यक्ष श्रीमती रेखे, पूर्व प्राथमिक विभागाचे अध्यक्ष श्री. रुणवाल, मुख्याध्यापक श्रीमती धरम, बालवाडी प्रमुख सौ. जोशी, मुळे, तुपे, म्हस्के उपस्थित होत्या.