केडगाव येथे महिलेची आत्महत्या

 

नगर- राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन 22 वर्षिय महिलेने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.3) रात्री साडेआठ वाजल्याच्या सुमारास केडगाव येथील अंबिकानगर येथे घडली. प्रियंका सुनील कांबळे (वय 22, रा.अंबिकानगर, केडगाव) असे मृत महिलेचे नाव असून रात्री 8.30 च्या सुमारास त्यांनी त्यांच्या राहत्या घरात छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी अभिजित जगताप यांच्या माहितीवरुन सीआरपीसी 174 प्रमाणे आकस्मात मृत्युची नोंद केली असून अधिक तपास पोलीस नाईक धोत्रे जी. एस. हे करीत आहेत. मृत प्रियंका कांबळे यांच्या पश्‍चात पती, सासु, दीर, 1 मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे.