पै. सुभाष गाढवे मल्हार केसरीचा मानकरी

 

नगर- निंबोडी येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत पै. सुभाष गाढवे याने अनेक मल्लांवर विजय प्राप्त करत मल्हार केसरी किताबाचा मान पटकावला. ग्रामस्थांनी रू.21,000 व चांदीची गदा देवून त्याचा सन्मान केला. सुभाष गाढवे सध्या शिव कुस्ती केंद्र, कवडगाव येथे सराव करत आहे. त्यास वस्ताद म्हणून उत्तर महाराष्ट्र केसरी पै. युवराज करंजुले व धनंजय खर्से यांचे मार्गदर्शन लाभले.