गोष्ट गोकुळातील

एकदा यशोदामाता यमुना नदीत दीपदान करत होत्या. दीपदान म्हणजे झाडाच्या पानावर पेटता दिवा वाहत्या प्रवाहासोबत सोडून देणे.

पूजेबरोबरच ती प्रथेप्रमाणे सगळे दिवे एकेक करून यमुनेमध्ये सोडत होती, पण पूजा संपल्यानंतर तिने प्रवाहावर नजर टाकली, तर लक्षात आलं की, आपण सोडलेले दिवे यमुना नदीच्या पात्रात तर दिसतच नाहीत आणि मध्येच दिवे बुडल्यासारखीही दिसत नव्हती.

नीट निरखून पाहिल्यावर तिच्या लक्षात आले की, किना-यावर एके ठिकाणी तिचा लाडका कान्हा थांबला आहे आणि काही दिवे त्याच्या पायापर्यंत पोहोचले आहेत. कान्हा एकेक करून ते दिवे पाण्यातून बाहेर काढून ठेवत आहे. यशोदेने विचारले की, लल्ला तू हे काय करतो आहेस..?

कान्हा म्हणाला, काही दिवे पुढे जाऊन पाण्यात बुडत होते. मी त्यांना वाचवत आहे.

यशोदेने विचारले की, म्हणजे तू नेमके काय करत आहेस?

कान्हा म्हणाला, अगं आई! जे जे दिवे या प्रवाहासोबत माझ्याकडे येतात, त्यांना मी उचलतो आणि काठावर ठेवतो. म्हणजे ते बुडत नाहीत.

यशोदा हसून म्हणाली, ‘अरे कान्हा, असे किती दिवे तू बाहेर काढून ठेवणार?’

यावर बाळकृष्ण तितकाच गोड हसून म्हणाला. अगं आई सगळेच दिवे मी वाचवणार नाही, पण जे माझ्याकडे येतील त्यांना तर मी नक्कीच बुडण्यापासून वाचवू शकतो ना! आणि माझ्यापासून जे दूर जातील, ते आपोआपच बुडतील.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा