चालणारी गाजरे

लंकेच्या राजाच्या कानी बिरबलाची कीर्ती गेल्याने त्याने बिरबलाच्या चातुर्याची परीक्षा पाहण्यासाठी आपल्या दुताबरोबर बादशहाला एक निरोप पाठविला. ‘आम्हाला चालती-फिरती गाजरे पाठवून द्या.’

बादशहाच्या दरबारातील लोकांना हि चालती-फिरती गाजरे, कशी आणि कोठून आणायची, हे समजेना. पण बिरबल म्हणाला, ‘हे काम माझ्यावर सोपवा.’

तेव्हा त्याने मध्यम आकारमानाचा लाकडी फळ्यांचा एक खोका घेऊन तो कसदार मातीने भरला व त्यात गाजराची रोपे लावली. काही दिवसांनी मुळांशी चांगली गाजरे तयार होताच, तो खोका बैलगाडीतून प्रथम जमिनीवरून व नंतर जलमार्गाने मचव्यातून लंकेस रवाना केला. हे पाहून लंकेचा राजा प्रसन्न झाला; आणि त्याने सम्राट म्हणून अकबर बादशहाला व चतुर सम्राट म्हणून बिरबलाला अतिशय मौल्यवान भेटवस्तू पाठवून दिल्या.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा