बेडकीला झाला गर्व

तळ्यातल्या बेडकांची काही मुलं खेळायला म्हणून काठाजवळच्या कुरणात आली. तेथे ती लपाछपीचा खेळ खेळू लागली. तेथील कुरणात एक मोठा बैल चरत होता. खेळता- खेळता बेडकाचे एक पोर बैलाच्या पायाखाली सापडून मरण पावले.

ते पाहताच बेडकाची सर्व मुले घाबरुन घरी आली. त्यातील एका मुलाने आईला ती हकीगत सांगितली आणि म्हणाला, ‘‘आई, आतापर्यंत आम्ही असा मोठा प्राणी कधी पाहिला नव्हता.

कसा धिप्पाड शरीराचा होता, बघ तो. त्यावर त्याची आई बेडकी म्हणाली,‘‘ मुला, खूप मोठा होताना तो? मुलगा ‘हो’ म्हणताच बेडकीने आपले पोट फुगवीत म्हटले,‘‘ इतका मोठा होता का रे?’’

त्यावर बेडकीने आणखी पोट फुगवून दाखविले. तेव्हा ती मुले म्हणाली,‘‘ आई, तू कितीही पोट फुगवून दाखविलेस, तरी त्या प्राण्याच्या नखाचीसुद्धा बरोबरी तू करु शकणार नाहीस.’’

तेव्हा बेडकी गर्वाने आणखी फुलू लागली असता एका क्षणी तिचे पोट फाटले आणि ती प्राणाला मुकली.

तात्पर्य – ज्याची बरोबरी आपण कधीही करु शकत नाही, तसा प्रयत्न केल्यावर संकट ओढवून घेण्यासारखे आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा