चतुर कोकरु

एका कुरणात एका कोकरांचा कळप चरत होता. चरता चरता त्यातील कोकरे इकडून तिकडे सारखी बागडत होती. खेळण्याच्या नादात एक कोकरू कळप चरत-चरत पुढे गेला तर मागेच राहिले. जवळच्याच कुरणात एक लांडगा कळपावर नजर ठेवून होता. एक कोकरू कळपापासून मागे राहिल्याचे त्याने पाहिले आणि तो त्या कोकराच्या मागे लागला. कोकरू धावू लागले.

पण आपण आता लांडग्याच्या तावडीत सापडल्याशिवाय राहत नाही, असे लक्षात येताच ते धावायचे सोडून हसत लांडग्याला म्हणाले, ’’लांडगेदादा, आता तुम्ही मला मारून खाणार, हे मी ओळखले आहे. पण मरताना आनंदाने हसत-हसत मरावे, असे मला वाटते. म्हणून तुम्ही थोडा वेळ तुमची बासरी वाजवा म्हणजे मी आनंदाने मरणाला सामोरा जाईन.‘‘

मागणी काही विशेष नसल्याने लांडग्याने ते कोकराचे म्हणणे मान्य केले. त्याने आपली बासरी काढली व ती वाजवू लागला. तसे कोकरू दोन पायावर उभे राहून नाचू लागले. तसा लांडगा बासरी आणखी जोराने वाजवू लागला. बासरीचा आवाज कुत्र्यांच्या कानी पडताच ते तेथे धावून आले. धावून आलेले कुत्रे पाहताच लांडग्याने बासरी दिली फेकून आणि त्याने तेथून पलायन केले.

पळता पळता मनाशी म्हणाला,’’आपले काम सोडून भलत्या कामात लक्ष घातल्याने अशी फजिती झाली. आपला कसायाचा धंदा सोडून भलत्या कामात लक्ष घातल्याने अशी फजिती झाली. आपला कसायाचा धंदा सोडून वाजंत्र्याचा धंदा केल्याने अगदी प्राणाशी बेतले होते.‘‘

तात्पर्य – छंदी माणसाला चतुर लोक सहज फसवू शकतात.