अपघात विरहित सेवा करणार्‍या एस.टी.च्या चालकांना रोख बक्षीस योजना

अहमदनगर- राज्य परिवहन, अहमदनगर विभाग अंतर्गत जे रा.प. चालक 12 महिन्यांमध्ये 260 दिवस विना अपघात सेवा बजावतात अशा चालकांना रुपये 1000/- व 12 महिन्यांपेक्षा जास्त दिवसात विना अपघात सेवा करणार्‍या चालकांना रुपये 600/- रोख बक्षीस देण्याची योजना अंमलात आहे.

अहमदनगर विभागात एकूण 328 चालकांनी अपघात विरहित सेवा केलेली असून पैकी 227 चालक रुपये 1000/- बक्षीस योजनेस पात्र असून 101 चालक रुपये 600/- रोख बक्षीस रकमेस पात्र ठरले आहेत.

सर्व बक्षीस चालकांचे अभिनंदन व्ही. एन. गिते, विभाग नियंत्रक, रा.प. अहमदनगर यांनी केलेले असून अहमदनगर विभागातील सर्व चालकांनी प्रवाशी जनतेस दर्जेदार अपघात विरहित सेवा देण्याविषयीचे आवाहन केले आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा