श्री स्वामी समर्थ संगीतालयाचे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

अहमदनगर – अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्यावतीने एप्रिल 2019 रोजी झालेल्या तबला वादन परीक्षेत प्रथमेश धर्माधिकारी हा मध्यमा पूर्ण परिक्षेत केंद्रात प्रथम आला तर प्रेरणा ढोरजे हिने प्रवेशिका प्रथम परिक्षेत विशेष योग्यता प्राप्त केली.

प्रवेशिका प्रथम परिक्षेत तेजस कोकाटे, प्रेरणा ढोरजे, ऋषिकेश निंबाळकर, वेद आडेप, यश पठारे, सुपर्ण प्रताप, यश लांडे हे सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

श्रमिकनगर, सावेडी येथील श्री स्वामी समर्थ संगीतालयाचे संचालक सुहास ढोरजे यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा