अहमदनगर -कोरोना विषाणू(कोव्हीड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत अहमदनगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचेकडील आदेशानुसार अहमदनगर छावणी क्षेत्रामध्ये आता सर्व सार्वजनिक ठिकाणी आणि कामाच्या ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई आहे.
कोणत्याही व्यक्तीने वरील नियमाचे उल्लंघन केल्यास साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ नुसार प्रथम अपराधासाठी रु. ५००/- इतका दंड, दुसर्या अपराधासाठी रु. १०००/- दंड व तिसर्या अपराधासाठी रू. १०००/- दंड तसेच भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार फौजदारी कारवाई केली जाईल अशी माहिती छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांनी दिली.