‘स्पा’ सेंटरवर छापा; दोघे अटकेत

अहमदनगर- ‘स्पा’ व मसाज सेंटरच्या नावाखाली शरीर विक्रय करणार्‍या सेंटरवर पोलीस अधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत एका पुरूषासह महिलेस अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि.19) रात्री 8.30 वाजता स्टेशन रोडवरील स्वस्तिक चौक येथे केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की स्टेशन रोडवरील गणेशवाडी येथे ब्लु डायमंड स्पा अँण्ड मसाज सेंटर येथे मसाजच्या नावाखाली शरीर विक्रयचा व्यवसाय होत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्यानुसार संदीप मिटके यांच्या पथकाने मसाज पार्लरवर छापा टाकला. या कारवाईत प्रदीपकुमार गोपाल शेट्टी (रा. कर्नाटक) व एक महिला यांना ताब्यात घेतले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्याच्या ठिकाणी पोलीसांनी कारवाई केल्याचे कळताच खळबळ उडाली. तसेच अन्य ग्राहकांची धावपळ झाली.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा