सोया पफ

साहित्य –

 • अर्धा कप सोयाचांक
 • १ चिरलेला कांदा
 • १ चिरलेला टोमॅटो
 • अर्धा कप वाफवलेला मटार
 • १ टी स्पून बारीक चिरलेला लसून
 • १ टी स्पून बारीक आलं
 • १ टी स्पून बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • टोमॅटो सॉस, तिखट, मीठ चवीनुसार, तेल.

पारीसाठी साहित्य –

 • १ कप मैदा
 • २ टेबलस्पून बारीक रवा
 • १ टेबलस्पून कॉर्नफ्लावर पाव टी स्पून मीठ
 • २ टेबलस्पून लोणी

कृती –

मैदा व रवा चाळून घ्या. लोणी लावून चोळा. पाण्याने भिजवा. सोयाचंक उकडून बारीक तुकडे करा. तेल गरम करून कांदा व टोमॅटो परता. आलं, लसूण, मिरच्या, मटार, सोया घाला.

सॉस, तिखट व मीठ घाला. मिश्रण गार करा. पिठाची पुरी लाटून सारण भरून अगदी लहान करंज्या बनवा. कडा काट्याने दाबून डिझाइन बनवा. मंद गॅसवर तळा. पुदिन्याच्या चाटणीबरोबर वाढा.

 

 

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा