14 पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षण जाहीर

नगरचे सभापतीपद सर्वसाधारण महिलेसाठी झाले राखीव

अहमदनगर – जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापतीपदासाठी आरक्षण सोडत गुरुवारी (दि.12) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काढण्यात आली. यामध्ये पारनेर, नेवासा, शेवगाव या 3 पंचायत समिती सभापतींची पदे सर्वसाधारण वर्गासाठी खुले राहिले आहेत.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत एकूण 14 सभापती पदांपैकी अनुसूचित जाती-1, अनुसूचित जाती महिला-1, अनुसूचित जमाती-1, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह)-2, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह)-2, सर्वसाधारण-3 आणि सर्वसाधारण महिला-4 अशा पद्धतीने आरक्षण सोडत काढण्यात आली.

त्यामध्ये अनुसूचित जाती- श्रीगोंदा, अनुसूचित जाती महिला – कोपरगाव, अनुसूचित जमाती – जामखेड, नागरीकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) – अकोले, पाथर्डी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) – राहुरी, श्रीरामपूर, सर्वसाधारण – पारनेर, नेवासा, शेवगाव, आणि सर्वसाधारण महिला – संगमनेर, राहाता, नगर, कर्जत अशी सोडत जाहीर करण्यात आली आहे.