धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यास प्राधान्य – निलेश खरपुडे

अहमदनगर- श्री विशाल गणेश हे शहराचे ग्रामदैवत आहे, नवसाला पावणारा हा श्री गणेश असल्याने त्यामुळे अनेकांची या श्री विशालवर श्रद्धा आहे. आपणही नियमित श्री विशाल गणेशाच्या दर्शनासाठी नियमित येत असतो. वाढदिवसानिमित्त आरती करुन पावसासाठी प्रार्थना केली. माळीवाडा तरुण मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते तन-मन-धनाने प्रयत्न करत असतात. धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यात सहभागी होऊन सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत असतो, असे प्रतिपादन माळीवाडा तरुण मंडळाचे अध्यक्ष निलेश खरपुडे यांनी केले.

माळीवाडा तरुण मंडळाचे अध्यक्ष निलेश खरपुडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने विश्‍वस्त विजय कोथिंबीरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, संदिप भुतारे, मयुर भापकर, आशिष खंदारे, अक्षय सांगळे, श्रीकांत आंबेकर, स्वप्नील आरडे, विशाल उदावंत, वैभव गाडळकर, प्रसाद भापकर, सागर भुतारे, शिवाजी गाढवे, शुभम थोरात, नितीन ताठे, रवि कानडे, शुभम भापकर आदि उपस्थित होते.

याप्रसंगी निलेश खरपुडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री विशाल गणेशास संदिप भुतारे यांच्यावतीने 101 नारळाचे तोरण अर्पण करण्यात आले. तसेच माळीवाडा परिसरात वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे सदस्य व मित्र परिवार उपस्थित होते.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा