पूरग्रस्तांसाठी स्नेहबंधने काढली मदतफेरी…

भिंगार – सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पुराने थैमान घातले असतांना अनेक गावे पाण्याखाली गेली असून, अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत त्यांना मदतीसाठी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या संकल्पनेतून भिंगार शहरातील नागरिकांकडून मदतफेरी काढण्यात आली.

पूरग्रस्तांसाठी यावेळी नागरिकांनी रोख रक्कम, कपडे तसेच जीवनावश्यक वस्तू जमा केले, ही मदत प्रत्यक्ष पूरग्रस्तांना दिली जाणार आहे.

यावेळी कॅन्टोन्मेंट सदस्या शुभांगी साठे, ज्योती शिंदे, सुशीला कापसे, सना पठाण, अमृता शिंदे, साक्षी झोडगे, सुशीला शिंदे, गणेश साठे, सुभाष चंगेडे, इसाक पठाण, संतोष शिंदे, बाबा पठाण, पियुष शिंदे, नवनाथ मोरे, भैय्या गांगर्डे, बाळू हारके, अरुण कार्ले आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, कोल्हापूर सांगलीच्या नागरिकांवर मोठे संकट आले आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी भक्कमपणे साथ द्यावी.

ई- पेपर  बातम्या   आत्मधन  ज्योतिष  वास्तुशास्त्र  संस्कृती  आरोग्य  गृहिणी  पाककला  सौन्दर्य  मुलांचे विश्व  सुविचार  सामान्य ज्ञान   नोकरी विषयीक   प्रॉपर्टी   अर्थकारण   मनोरंजन   तंत्रज्ञान  क्रिडा  पर्यटन  निधनवार्ता   पोल  प्रश्नमंजुषा